गडचिरोली शहरातील अतिक्रमणधारकांना मालकी हक्क मिळवूून देणार ! आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे पक्षप्रवेश सोहळयात प्रतिपादन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील काही भागात गेल्या अनेक वर्षापासून पट्टेधारक व अतिक्रमणधारक कच्च्या घरात निवास करतात. परंतू त्यांना जागेचा मालकी हक्क मिळाला नाही. अतिक्रमणधारक गृहकर सुध्दा भरतात. नगर परिषदेच्या वतीने वीज, पाणी रस्ते, नाल्या आदी सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नगर पालिकेकडून मालकी हक्क देण्याबाबत कार्यवाही सुध्दा करण्यात आली होती. परंतू अद्यापही गोरगरीबांना जागेचा मालकी हक्क मिळाला नसल्याने घरकुल योजनेच्या लाभापासून वंचीत आहे., अतिक्रमणधारकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकतेच गडचिरोली येथे झालेल्या पक्षप्रवेश सोहळयाप्रसंगी केले.
नुकत्याचा पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळयात माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह, अनेक माजी नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांनी राष्टवादी कॉंग्रेस अजीत पवार गट प्रवेश केला. गडचिरोली नगरपालिका निवडणूकीसाठी राष्टवादी कॉंग्रेस व शिंदे सेना यांची युती झाली असून माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वात युती निवडणूकीच्या रणांगणात उतरणार आहे.
गोकुळनगर, विवेकानंदनगरातील नागरिक घरकुलापासून वंचीत
नगर पालिकेच्या वतीने सात आठ वर्षापुर्वी गडचिरोली शहरातील गोकुळनगर व विवेकानंदनगर वार्डात १ हजार ०८ घरकुल मंजूर झाले होते. परंतू जागेच्या मालकीअभावी या दोन्ही वार्डातील गोरगरीब नागरिक घरकुलाच्या लाभापासून वंचीत आहेत.