राजकीय

अन्याया विरोधात पेटून उठलेल्या अरविंद कात्रटवारांचा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र!  – पक्षात दुफळी माजविल्याचा आरोप करीत जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारीवर कात्रटवार गरजले :  कात्रटवार यांच्या समर्थनार्थ गावागावातून हजारो कार्यकर्ते एकवटले

 

 

AVB NEWS गडचिरोली :- गेल्या३५ वर्षापासून शिवसेनेत निस्वार्थ भावनेने काम करणारे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून शासन प्रशासनाशी लढा देणारे आणि गडचिरोलीत शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून म्हणून ओळख असलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे गडचिरोली जिल्हयात पक्षाला मोठा हादरा बसणार आहे

अरविंद कात्रटवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यासाठी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावागावातील हजारो कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या समर्थनार्थ एकवटले होते.‘जय भवानी, जय शिवाजी’ नेता कैसा हो अरविंदभाऊ कात्रटवार जैसा हो अशा गगनभेदी घोशणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर अरविंद कात्रटवार यांच्याप्रती आपुलकी आणि प्रेमभावना उमटून दिसत होती. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारी यांनी आपल्यावर केलेल्या अन्यायाचा अरविंद कात्रटवार यांनी पाढा वाचला

गेल्या ३५ वर्षापासून जनतेच्या कल्याणासाठी निस्वार्थ भावानेने काम करणाऱ्या आणि पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या शिवसैनिकाचे महेश केदारी यांनी मानसिक खच्चीकरण केले . जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी रस्त्यावर उतरून शासन व प्रशासनाशी लढणाऱ्या माझ्या सारख्या शिवसैनिकाचे पद काढून पदासाठी हपापलेल्या संधीसाधूंना पदे वाटली

महेश केदारी यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची गडचिरोली जिल्हयात ताकद न वाढविता केवळ वसूलीसाठी जिल्हयाचे संपर्क प्रमुखपद स्विकारले. आपण त्यांना थारा दिला नाही म्हणून मला त्यांनी मला दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न सुरू केला. हे मी कदापी सहन केले नाही. मी स्वताच्या बळावर पक्ष वाढविला. मात्र केदारी सारख्यांमुळे पक्षात राहून कोणतेही भवितव्य नसल्याने नाईलाजास्त राजीनाम देत असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.

आम्हाला पक्षाशी देणेघेणे नाही, आम्हाला केवळ जनतेची काम करणारा तुमच्यासारखा नेता हवा

अरविंद कात्रटवार यांनी आपल्यावर प़क्षाकडून झालेल्या अन्यायाचा पाढा वाचल्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करीत असल्याचे स्पष्ट केले. त्यास मौशीखांब -मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी समर्थन देऊन आम्हाला पक्षाशी देणेघेणे नसून जनतेची कामे करणाऱ्या आणि या भागाच्या विकासाला चालणा देणाऱ्या तुमच्या सारख्या तळपदार नेत्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

स्वार्थासाठी दुसऱ्यापुढे हात पसरविणे म्हणजे निर्लज्जपणाचे लक्षण :- अरविंद कात्रटवार

मी जनतेच्या हितासाठी स्व:ताच्या बळावर झटणारा जनसेवक आहे आपला स्वाभिमान गहान ठेवून पदासाठी अथवा स्वार्थासाठी कुणापुढे हात पसरविणे म्हणजे निर्लज्जपणाचे लक्षण आहे. महेश केदारी यांच्या सारख्यांमुळे स्वाभिमानाला ठेच पोहचू नये म्हणून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. मौशीखांब. मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी माझी सतत धडपड सुरू आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूकीची उमेदवारी महेश केदारी सारख्यांमुळे मिळण्याची मुळीच शक्यता नसल्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला अणि माझ्या शेकडो समर्थकांचे त्यास समर्थन आहे हीच माझ्या आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती आहे. आता एकच ध्यास, जिल्हा परिषद निवडणूकीत विजय संपादन करून मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावांचा आणि गावातील प्रत्येक नागरिकांचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे अरविंद कात्रटवार म्हणाले.

याप्रसंगी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.