गडचिरोलीत राष्ट्रवादी – शिंदेसेना युतीचे उमेदवार घोषित , तर काँग्रेस व भाजपा मध्ये उमेदवारीसाठी इच्छूकांचा जीव टांगणीला,,! – युतीकडून नगराध्यक्षपदासाठी आश्विनी नैताम यांना उमेदवारी, शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर रणांगणात उतरणार – सोमवारी होणार सर्वच पक्षाची नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नामांकन दाखल करण्यासाठी केवळ दोन उरले आहेत. मात्र कॉंग्रेस व भाजपा या राष्ट्रीय पक्षाकडून अद्यापही नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांची घोषणा झालेली नाही. मात्र अजीत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना युतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार घोषीत करण्यात आघाडी घेऊन निवडणूकीसाठी जोरदार कंबर कसल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस सुध्दा स्वबळावर गडचिरोली नगरपालिकेची निवडणूक लढणार असून रविवारी त्यांच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला आहे. राज्यात महायुती व महाविकास आघाडी असली तरी नगरपालिकेच्या निवडणूकीत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शरद पवारांचीराष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीचा प्रमुख पक्ष असलेली भाजपा स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर राज्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची गडचिरोली नगरपालिका निवडणूकीसाठी युती झाली आहे. त्यामुळे युती आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात व माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वात नगर पालिका निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. युतीने नगराध्यक्ष पदासाठी तेली समाजातील आश्विनी नैताम यांना उमेदवारी घोषीत केली आहे. तसेच सर्व प्रभागातील नगसेवक पदाच्या उमेदवारांची निश्चिती करून उमेदवार घोषीत करण्यात आघाडी घेतली आहे. कॉंग्रेस व भाजपाच्या उमेदवारांची रविवारी अथवा सोमवारी घोषणा होण्याची शक्यता आहे नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेबर असून सोमवारी नामांकन दाखल करण्यासाठी गर्दी उसळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना ( शिंदे गट ) युतीचे नगर सेवक पदाचे उमेदवार
——————————————
नगराध्यक्षपदासाठी आश्विनी रविंद्र नैताम
प्रभाग क्रमांक 1- संघमित्रा खोब्रागडे आणि अविनाश कायरकर
प्रभाग क्रमांक 2 – लता मुरकुटे आणि केतन नैताम
प्रभाग क्र 3 – पंकज नैताम आणि अर्चना सोनटक्के
प्रभाग क्रमाकं 4 – हेमंत जंबेवार आणि शितल बन्सोड
प्रभाग क्रमांक 5 – बंटी खडसे आणि उमा बन्सोड
प्रभाग क्रमांक 6 – पोर्णीमा गव्हारे
प्रभाग क्रमांक 7 – रवि मेश्राम आणि सुवर्णा पवार
प्रभाग क्रमांक 8 – दिपक बारसागडे आणि सुमंत काळे
प्रभाग क्रमांक 9 – विनोद भांडेकर आणि सिमा टिंगुसले
प्रभाग क्रमांक 10- निर्मला मडके आणि प्रविण नैताम
प्रभाग क्रमांक 11 – लिलाधर भरडकर आणि प्रतिभा कुमरे
प्रभाग क्रमांक 12 – वासुदेव बट्टे आणि लोमेश्वरी वासेकर
प्रभाग क्रमांक 13 – संघरक्षीत फुलझेले, माधुरी मंगरे, अंजूम माजीद सय्यद