जिल्हा

 शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नाकर शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये शामील

AVB NEWS गडचिरोली :-  शहरातील शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेशजी रत्नाकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारींसह पक्ष प्रवेश केला ज्यामुळे काँग्रेस पक्षाला फार मोठा हादरा बसला आहे.राकेश रत्नाकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे प्रभाग क्रमांक ५ छत्रपती शाहूनगर मध्ये जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी उमेदवारी जाहीर केली, राकेश रत्नाकर यांच्यासह प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी दुपट्टा घालून पक्ष प्रवेश दिला
राकेश रत्नाकर यांच्यासह प्रवेश घेणाऱ्या प्रमुख पदाधिकारी बेबीबाई कुमरे, वैशालीबाई सातपुते, अनिताबाई डोईजड,राजू भारती,विनायक चिचघरे पुरुषोत्तम सिडाम, किशोर सोनवाणे, पंढरी पाटील डोमळे सुरेश श्रुगारपवार, अमोल वोडेवार व त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केला त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी ओबीसी विभागाचे अध्यक्ष शेमदेवजी चापले, जिल्हा उपाध्यक्ष नईमभाई शेख, गडचिरोली शहराध्यक्ष एजाज शेख, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हुसेनभाई शेख ,जिल्हा उपाध्यक्ष संजयजी शृंगारपवारव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.