गडचिरोलीत उध्दवसेनेला मोठा हादरा, अरविंद कात्रटवार यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ‘जय महाराष्ट्र – जिल्हा संपर्क प्रमुख केदारी यांच्यावर साधला निशाना, केदारीमुळे जिल्हयात उध्दवसेनेची मोठी पिछेहाट झाल्याचा आरोप.

एव्हीबी न्यूज गडचिरोली :– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पर्वावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हयातील पक्षाचे ‘हेवीवेट’ नेते अरविंद कात्रटवार यांनी पक्षाला :जय महाराष्ट्र केला आहे. त्याच्या राजीनाम्यामुळे गडचिरोली जिल्हयात पक्षाला मोठा हादरा बसणार आहे. कात्रटवार यांनी जिल्हयाचे संपर्क प्रमुख महेश केदारी यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करीत त्यांच्यावर जोरदार निशाना साधला आहे. अरविंद कात्रटवार यांच्या राजीनाम्यामुळे गडचिरोली जिल्हयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
अरविंद कात्रटवार यांनी पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना दिलेल्या राजीनामापत्रात जिल्हा संपर्क प्रमुख महेश केदारीवर जोरदार हल्ला चढविला आहे. कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे की,
मी गेल्या ३५ वर्षापासून हिंदु हदसम्राट आणि पुज्यनिय मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षात अविरत कार्यरत आहे. पक्षनिष्ठा आणि मासाहेब मिनाताई ठाकरे आणि पूज्यनिय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा आदर्श जोपासून पक्षासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करीत आहेत. मागील ३५ वर्षा पासून जनतेच्या हितासाठी हजारो आंदोलन, मोर्चे काढून न्याय मिळवून दिला. पक्षात दुफळी माजल्यानंतर पक्षाच्या संकटाच्या काळात सुध्दा आपली साथ सोडली नाही.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ‘ब्रिद’ जोपासून गडचिरोली जिल्हयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष जीवंत ठेवला. गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाची ओळख कुणामुळे आहे हे जनतेला माहित आहे
मात्र, श्री. महेश केदारी यांच्याकडे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुखांची जबाबदारी सोपविण्यात आल्यापासून श्री. केदारी यांनी पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना सापत्नीक वागणूक देऊन माझ्यासारख्या निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या शिवसैनिकाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. केदारी हे पक्षासाठी कोणतेही काम न करणाऱ्या आणि जनतेमध्ये कोणतेही अस्तित्व नसलेल्या आणि लागुंनचालन करणाऱ्यांना जवळ करून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहेत श्री. केदारी यांनी आपल्या मर्जीतल्या आयाराम गयारामांना पदे वाटली. माझ्याकडे असलेले जिल्हा सहसंपर्क प्रमुख पद काढून घेण्यात आले. त्यामुळे माझ्या निस्वार्थ कार्याला आणि स्वाभीमानाला ठेच पोहचली आहे. माझ्याकडे कोणतेही पद नसल्याने पक्षासाठी काम करण्यास अडचनीचा सामना करावा लागत आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून तयारी केली आहे. श्री. केदारीचे मांडलिकत्व मी स्विकारले नसल्यामुळे मला उमेदवारीचा बि फार्म मिळण्याची कवडीचीही शक्यता नाही. गेल्या ३५ वर्षापासून निस्वार्थ भावनेने शिवसेनेचा लढवय्या शिवसैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. पण माझावर झालेलेल्या अन्यायामुळे पक्ष सोडतांना दु्ख होत आहे.गडचिरोली जिल्हयात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अधोगती करणाऱ्या महेश केदारी सारख्या लोकांमुळे नाईलाजास्तव माझ्या शेकडो समर्थकांसह पक्ष सोडण्याचा निर्धार केला असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनाम देत असल्याचे कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे