राजकीय

गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणणार ! – आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन – प्रा. राजेश कात्रटवार यांचा शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत कॉंग्रेस (अजीत पवार गट ) मध्ये प्रवेश

एव्हीबी न्यूज गडचिरोली  :- गडचिरोली शहराच्या राजकारणात दबदबा असलेले माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांनी काल 12 नोव्हेंबर रोजी आपल्या शेकडो समर्थकांसह माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजीत पवार गट ) मध्ये प्रवेश केला. यावेळी धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रा. कात्रटवार यांच्या पक्षत्रप्रवेशामुळे गडचिरोली शहरात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाल्याचे सांगून गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.

यावेळी आयोजित मेळाव्यात राका चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रा. राजेश कात्रटवार, शिवसेना सह संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार, राका महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे,जेसा मोटवनी, नाना नाकाडे, शहर विकास आघाडीच्या उमेदवार अश्विनी नैताम (खोब्रागडे ), राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सुनिल डोगरा, माजी नागराध्यक्ष प्रमोद वैद्य आदी उपस्थित होते.

जनसेवेसाठी आपले उभे आयुष्य वेचलेल्या प्रा. राजेश कात्रटवार यांच्या प्रवेशाने शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केले. नगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी विकासासाठी मतदान करावे.विकासाठी निधी कमी पडू देणार नाही. राष्ट्रवादी – शिवसेना युती मधील सर्वच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन धर्मरावबाबांनी केले.
न. प. वर आमची सत्ता आल्याबरोबर शहरातील नागरिकांना घरकुलासाठी पट्टे देणे, शहरात बंदिस्त सभागृह उभारणे, न. प. ची स्वतंत्र इमारत उभारणे, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ व सुंदर शहर यासाठी विशेष उपक्रम आदी बाबी प्रधान्याने करण्यात येणार असल्याचेही धर्मरावबाबा म्हणाले. निवडून आलेल्या नगरसेवकांना कोणत्याही प्रकारची ठेकेदारी करता येणार नाही, असेही धर्मरावबाबा यांनी ठणकावून सांगितले.

या प्रमुख नेत्यांचा झाला पक्ष प्रवेश
प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वात कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुधीर रोहणकर, सुनिल डोगरा, माजी नगराध्यक्ष निर्मला मडके, दीपक मडके, माजी नगरसेविका लता मुरकुटे, रवी नैताम, सुरज खोब्रागडे, चेतन नैताम, पंकज नैताम, राकेश नैताम, प्रदीप भांडेकर, वासुदेव बट्टे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

सत्ता आल्याबरोबर शहरातील नागरिकांना जमिनीचे पट्टे,शुद्ध पाणी व स्वच्छता  :- प्रा.कात्रटवार
शहराच्या सर्वांगीन विकासासाठी आपण आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना युतीची सत्ता आल्याबरोबर शहरातील नागरिकांना घरकुलसाठी पट्टे, स्वच्छ व सुंदर शहर संकल्पना, पिण्याचे शुद्ध पाणि आदी नागरिकांभिमुख उपक्रम राबवीण्याचा मनोदय प्रा. राजेश कात्रटवार यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य नागरिकांसाठी अहोरात्र आपण सेवत असतो, हे शहरातील नागरिकांना माहितीच आहे.आता धर्मरावबाबा यांच्या रूपाने विकासासाठी निधी खेचून आणनारे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात शहराचा सर्वांगीन विकास करण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचेही प्रा. कात्रटवार म्हणाले.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.