जिल्हा खनिजनिधी अंतर्गत जिल्ह्यातील मामा तलावाच्या खोलीकरणसाठी निधी उपलब्ध करून द्यावा: – राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांची मागणी
गडचिरोली जिल्ह्यातील मामा तलाव खोलीकरण करावे व तलावातील पाणीसाठा वाढण्यासाठी कार्य करावे-

AVB NEWS गडचिरोली :-जिल्हा खनिज निधीतून जिल्हयातील मामा तलावाचे खोलीकरण करून सिंचनक्षमता वाढवावी, अशी मागणी राष्टीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील स्थाणिक मामा तलावास डॉ.प्रणय भाऊ खुणे
यांनी सदिच्छा भेट दिली व या तलावात यावर्षी गाळयुक्त शिवार गाळमुक्त धरण योजना अंतर्गत नाम फाउंडेशन द्वारे उत्कृष्ट कार्य करण्यात आला आला. या कार्यामुळे तलावाचा पाणीसाठा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळमुळे शेती उत्पादन सुद्धा वाढलेला आहे याबद्दल डॉ. प्रणय खुणे यांनी समाधान व्यक्त केले व गडचिरोली जिल्ह्यातील समस्त मामा तलाव जलसंधारण विभागाच्या वतीने खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी केंद्र व राज्य सरकारला केली व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा नियोजन विभागातून खनिज विकास निधी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील मामा तलाव खोलीकरण करण्यात यावा अशी मागणी केली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सल्लागार देवानंद भाऊ खुणे. भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर गुरुजी. नितेश भाऊ खुणे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.