राजकीय

गडचिरोलीत कात्रटवारांची शहर विकास आघाडी काँग्रेस , भाजपाला फोडणार घाम !  – आश्विनी नैताम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चीत, नगरसेवक पदाच्या तगडया उमेदवारांची यादी तयार –  – लवकरच होणार घोषणा, अजीत पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची मिळणार साथ

AVB NEWS गडचिरोली  :- जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणूकीचे राजकीय वातावरण लवकरच गरम होणार आहे. सदर निवडणूक कॉंग्रेस व भाजपा स्वबळवार लढणार आहे. या निवडणूकीसाठी माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांच्या शहरविकास आघाडीने जोरदार तयारी केली असून नगराध्यक्षपदाचा उमेदवार सुध्दा निश्चित केला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी उमेदवारांची नावे सुध्दा निश्चित झाली आहेत. शहरविकास आघाडीने निवडणूकीची जोरदार तयारी केली असून अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदेसेनची साथ मिळाल्याने कॉंग्रेस व भाजपा समोर तगडे आव्हान उभे ठाकणार आहे.
गडचिरोली नगरपालिकेची निवडणूक कॉंग्रेस व भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुध्दा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. . महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजीत पवार यांच्या राश्टवादीचे नेते तथा आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आधीपासूनच स्वबळाचा नारा दिला आहे. त्यादृश्टीने त्यांनी मागील दोन महिन्यापासूनच निवडणूकीची तयारी करून व्युहरचना सुध्दा आखली आहे. शहरविकास आघाडीच्या मदतीने अजीत पवार यांची राष्ट्रवादी गडचिरोली नगरपरिषदेची निवडणूक लढणार असून त्यांना शिंदे सेनेची सुध्दा साथ मिळणार आहे. निवडणूकीची धुरा शहविकास आघाडीचे प्रा. राजेश कात्रटवार यांच्यावर असून धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आणि प्रा. राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वात शहरविकास आघाडी निवडणूकीच्या रिंगणात उतणार असल्याचे आता स्पष्ट  झाले आहे. त्यामुळे गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होणार आहे.

आश्विनी रविंद्र नैताम यांना नगराध्यध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित !

सन 2025 च्या निवडणूकीसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून तेली समाजातील नव्या व तरूण चेहऱ्या ला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर विकास आघाडीने आश्विनी रविंद्र नैताम या तरूण नेतृत्वाला उमेदवारी निश्चित केली आहे. आश्विनी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकिय नसली गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या समस्यांची सोडवणूक आणि शहराच्या विकासाची तळमळ हे ध्येय उराशी बाळगूण जनसेवेसाठी निवडणूकीच्या मैदानात उतरणार आहे.

जनतेच्या सेवा कार्यात सदैव तत्पर असलेले नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रा राजेश कात्रटवार यांचा गडचिरोली शहराच्या राजकारणात दबदबा आहे सन 2016 च्या नगर परिषद निवडणूकीत शहर विकास आघाडीच्या झेंडयाखाली कात्रटवार पॅनलने निवडणूक लढवली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावर्शीच्या निवडणूकीत कात्रटवार यांची शहर विकास आघाडी अजीत पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिंदे सेनेच्या मदतीने निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याने शहर विकास आघाडीचे मनोबल वाढले आहे

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.