जिल्हा
माजी खा. अशोक नेते, आ. भांगडिया, प्रशांत वाघरे यांच्याकडे निवडणूकीची जबाबदारी – भाजपाकडून निवडणूक प्रभारी व प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नगर परिषद व नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपाने निवडणूकीच्या कार्यालयाला वेग दिला आहे. पक्षाच्या वतीने प्रदेश स्तरावरून जिल्हा निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुखांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.
पक्षाने गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खा. अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आ. बंटी भांगडिया आणि गडचिरोली भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्याकडे निवडणूकीची महत्वपुर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
माजी खा. अशोक नेते यांच्याकडे चंद्रपूर जिल्हयाचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चिमूरचे आ. बंटी भांगडिया यांच्याकडे गडचिरोलीचे निवडणूक प्रभारी म्हणून तर माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांची जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.