विशेष

गडचिरोली नगरपालिका निवडणूक,: भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवारी वरून ‘‘वेट अॅन्ड वॉच’ !  सर्व्हेक्षणाअंती होणार उमेदवाराची निवड; पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत पिपरेंना आशावाद, निंबोरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे उमेदवारीसाठी होणार रस्सीखेच

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नगर परिषद निवडणूकीचा बिगूल वाजला असून निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम घोषित  केला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी गडचिरोलीसह राज्यभरातील 246 नगरपरिशद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणूका पार पडणार आहेत. आता सगळीकडे उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. गडचिरोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या राजकीय वातावरणाला आता वेग आला आहे. कॉंग्रेसने माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांना पक्षप्रवेश देऊन त्यांच्या अर्धांगीणींना उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. मात्र भाजपाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण राहील याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपाने प्रत्येक नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची नावे तयार ठेवली आहेत. मात्र उमेदवारीचा अंतिम निर्णय जनतेमधून कौल जाणून घेउुन मतदारांमध्ये त्या उमेदवाराविषयी काय भावना आहे याचे सर्व्हेक्षण करूनच होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गडचिरोली नगर परिषद निवडणूकीसाठी आता वातावरण ढवळून निघाले असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी इच्छूकांची भाउुगर्दी दिसून येत आहे. नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडणून द्यायचा आहे. त्यानुसार हेविव्हेट’ उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. नुकतेच शरद पवार गटाचे राश्टवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांनी पत्नीसह कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. नगराध्यक्षपदासाठी कविता पोरेड्डीवार यांची कॉंग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून उमेदवारीबाबत ‘वेट अॅन्ड वॉच’ दिसून येत आहे. सागर निंबोरकर यांनी पत्नीसह भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांनी पत्नीसाठी उमेदवारीसाठी जोर लावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद पिपरे व माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या समोर उमेदवारीवासाठी पक्षांतर्गत आव्हान उभे ठाकले आहे. त्याचबरोबर माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांची पॅनल सुध्दा जोमाने नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होण्याची चिन्ह आतापासूनच दिसून येत आहे.

सन 2016 च्या नगर परिषद निवडणूकीत भाजपाने एकतर्फी विजय संपादन केला आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तेली समाजाच्या योगीता पिपरे यांनी दिली होती. पिपरे यांनी पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार यांचा तब्बल 2 हजार 894 मतांनी पराभव केला होता. मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या बळावर 2025 च्या निवडणूकीत सुध्दा पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांच्याकडून बाळण्यात आली असून भाजपाचे जेष्ठ नेते प्रमोद पिपरे यांनी पत्नी योगीता पिपरे यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला आहे. मात्र यावर्षी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून इच्छूकांची भाऊगर्दी दिसून येत आहे. अशातच पक्षांतर्गत असलेली गटबाजी लक्षात घेता प्रमोद पिपरे यांना पत्नीसाठी उमेदवारी प्राप्त करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

असे होणार सर्व्हेक्षण
प्रत्येक नगरपालिकेच्या शहरातून घेतलेल्या तीन नावाविशयी मतदारांमध्ये काय भावना आहे त्या तिघांपैकी कोण पहिल्या क्रमांकावर आहे याबाबत प्रदेश भाजपाकडून येत्या दोन तीन दिवसात सर्व्हेक्षण केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या तीन नावाव्यतिरिक्त एखादा प्रभावी व्यक्ती योग्य उमेदवार ठरू शकतो काय याचा पण विचार केला जाणार आहे. एखादा उमेदवार भाजपामध्ये सक्रीय नाही पण समाजामध्ये मोठया प्रमाणात जनसंपर्क आणि मान्यता आहे अशा व्यक्तीला उमेवारी देण्याबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.