विशेष
		
	
	
शितल सोमनानी यांची तत्परता, गरोदर महिलेचे वाचले प्राण

AVB NEWS गडचिरोली :- घोट येथील गरोदर महिला पोर्णीमा कांदो ही महिला गडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात प्रसुतीसाठी भरती झाली होती. सदर महिलेला रक्ताची गरज लक्षात घेता जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या शितल सोमनानी यांनी तत्काळ रूग्णालय गाठत रक्त मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर रक्त उपलब्ध झाले. आणि वेळेवर उपचार झाल्याने गरोदर महिलेचे प्राण वाचले.
या महत्वपुर्ण मदतकार्यात सामाजिक कार्यकर्त्या शितल सोमनानी यांना शोभा सोमनानी , स्वप्निल पोगुलवार, सचिन येनगंटीवार, अर्पीत दुधबावरे, प्रमोद सातार, अभिशेक गुरूनुले, संकेत कुनघाडकर यांनी सहकार्य केले.
