जिल्हा

मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळा दुरूस्तीसाठी शिवसेनेचा (उबाठा)  जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’  * अरविंद कात्रटवार यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष, समस्या तातडीने सोडविण्याची केली मागणी  * शेकडो शिवसैनिकांनी घोषणा देऊन जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला

AVB NEWS गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांची झालेली दुरावस्था लक्षात घेता शाळांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, शैक्षणिक विकासासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, या मागणीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक व नागरिक एकवटले. जिल्हा परिषदेवर ‘हल्लाबोल’ आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांची तातडीने दुरूस्ती झालीच पाहिजे, जय भवानी जय शिवाजी अशा घोशणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

अरविंद कात्रटवार यांनी शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शाळांच्या दुरूस्तीबाबत चर्चा केली आणि समस्या तातडीने सोडविण्याची मागणी रेटून धरली. अरविंदभाऊकात्रटवार यांनी शिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले की, शाळांच्या इमारती व शाळांमध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे परंतू गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांचा सुमार दर्जा लक्षात घेता शासनाच्या मुळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे शाळांचा दर्जा न सुधारल्यास ग्रामीण भागातील शिक्षणाचा विकास कसा होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे

भारतीय संविधानाने 4 ऑगस्ट 2009 रोजी लागू केलेला बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा ज्याद्वारे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे. शाळांच्या इमारती व शाळांमध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतू गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांचा सुमार दर्जा लक्षात घेता शासनाच्या मुळ हेतूला हरताळ फासला जात आहे

जिल्हा नियोजन समितीस उपलब्ध होणाऱ्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षणाशी संबंधित योजनांसाठी खर्च करावयाचा आहे हा निधी कायमस्वरूपी राखून ठेवण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा परिषदांच्या क्षेत्रातील शाळांची इमारत आणि वर्ग खोल्यांची दुरूस्ती तसेच स्वच्छतागृहांची दुरूस्ती वर्गखोल्यांचे बांधकाम स्वच्छतागृहांचे बांधकाम पिण्याच्या पाण्याची सुविधा वाचनालय शैक्षणिक बोलक्या भिंती निर्माण करणे विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र कक्षाचे बांधकाम क्रीडांगणाची सुविधा शाळांना संरक्षक भिंत उभारणे क्रमप्राप्त आहे परंतू सोयी सुविधांचा अभाव असल्याने
मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात आंबेशिवणी आंबेशिवणीटोली आंबेटोला मौशीखांब अमिर्झा अमिर्झा टोली कळमटोला टेंभा मरेगाव मौशीखांब बेलगाव भिकारमौशी रानखेडा मुरमाडी गिलगाव बोथेडा मोहटोला या गावांचा समावेश आहे. परंतू या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा खालावला आहे. काही शाळांच्या इमारती जिर्ण झाल्या असून कोसळण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळयात छतातून पाण्याची गळती लागते. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषद शाळांच्या सुविधांमध्ये उपस्थिती वाढवण्यासाठी आणि गळती रोखण्यासाठी तातडीने शाळांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, शाळा दर्जा सुधारण्यात यावा आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली. अन्यथा विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत शाळांना ‘कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला.

याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.