गडचिरोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का ! – जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

गडचिरोली :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर सर्वत्र पक्षांतराला वेग आल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जेष्ठ नेते तथा गडचिरोली शहराचे माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार त्यांच्या पत्नी कविता पोरेड्डीवार आणि अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस कमेटीचे प्रदेशाध्यक्ष हर्शवर्धन सपकाळ, कॉंग्रेसचे विधीमंडळ गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आज सोमवारी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला. पोरेड्डीवार यांच्या कॉंग्रेस प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का बसला आहे.
लवकरच गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक होणार असून या निवडणूकीच्या तोंडावर सुरेश सा. पोरेड्डीवार यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून राजकीय नवीन ‘इंनिंग’ सुरू केल्याची बोलले जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष विजय गोरडवार यांनी सुध्दा कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर गडचिरोली येथील पार पडलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्ता व पक्षप्रवेश मेळाव्यात माजी जि.प.अध्यक्षा हर्शलता येलमुले यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारयांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार यांच्या पक्षप्रवेशामुळे गडचिरोली शहरात कॉंग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.