AVB NEWSगडचिरोली :- भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका शिवसैनिकाचा मृत्यू तर दुसरा गंभिर जखमी झाल्याची घटना गडचिरोली तालुक्यातील गोगाव जवळ नुकतीच घडली. या अपघातात मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शिवसैनिक सुनिल मुखरू कोहपरे यांचा मृत्यू झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसैनिकाच्या कुटुंबाचे सांत्वन करून शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच मृतक शिवसैनिकाच्या अर्धांगीणीला आर्थिक मदत देऊन आपण सदैव कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे सांगून कुटुंबाला आधार दिला.
६ ऑक्टोबर रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक यादव मलोडे रा. रानखेडा व सुनिल कोहपरे रा. मौशीचक या दुचाकीस्वारांना आरमोरी मार्गावरील गोगावजळ आरमोरी वरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली.या अपघातात दोघेही गंभिर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र सुनिल कोहपरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर आभाळ कोसळले. केवळ शिवसैनिक नव्हे तर गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी अपघाती निधन झालेले शिवसैनिक सुनील कोहपरे यांच्या घरी शेकडो शिवसैनिकांसह जावून कुटुंबियांचे सांत्वन करून आधार दिला व आर्थिक मदत दिली. कुटुबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मृतक शिवसैनिकाच्या कुटुंबियांना दिली.
बाळाला बघण्याचे स्वप्न अपुर्ण राहिले
मौशीचक येथील मृतक शिवसैनिक सुनिल कोहपरे यांचा विवाह दहा वर्षापुर्वी झाला.पण त्यांना मुलबाळ नव्हती. तब्बल दहा वर्षांनंतर सुनिलची पत्नी गरोदर असून सातवा महिना सुरू आहे. विलंबाने का होईना संसाराच्या वेलीवर फुल उमलणार असल्याने पती पत्नी व कुटुंबिय आनंदात होते.पण नियतीने डाव साधला आणि आनंद हिरावून घेतला.सुनिल च्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडले आहे. संसाराच्या वेलीवर फुल उमलण्यापुर्वीच सुनिल कोहपरे या शिवसैनिकाने जगाचा निरोप घेतला. संसाराच्या वेलीवर उमलणाऱ्या आपल्या नवजात बालकाचा गोडस चेहरा बघण्याचे भाग्य लाभले नाही.
यावेळी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते