हत्तीने नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्या – सामाजिक कार्यकर्ते नवनाथ उके यांची मागणी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली शहरपासून जवळच असलेल्या गोगाव येथील शेतकऱ्यांचे जंगली हत्तींनी धान पिकाचे नुकसान केले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ उके यांनी केली आहे.
नवनाथ उके यांनी नुकतीचे शेतकर्यांच्या बांधावर जावून हत्तींनी नुकसान केलेल्या धान पिकाची पाहणी केली. उके यांनी म्हटले आहे की, धान पिक हे शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. कुटुंबाचा गाडा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. धान पिक कापणीच्या मार्गावर असतांना रानटी हत्तींनी धान पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. तसेच हत्तीमुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. हत्तींनी धान पिक पायदळी तुडवून मोठे नुकसान केले आहे.
17 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास जंगली हत्तींनी गोगाव शेतशिवारात प्रवेश करून एका शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठे नुकसान केले. सदर शेतकर्याने घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते नवनाथ उके यांना दिली. उके यांनी सदर शेतकर्याच्या शेतात जाउुन पाहणी. नुकसानीची माहिती जिल्हयाचे सहपालकमंत्री आशिश जयस्वाल यांना दिली आहे. जंगली हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नवनाथ उके यांनी सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे केली आहे. नुकसानाची पाहणी करतांना गोगाव अडपल्ली येथील शेतकरी उपस्थित होते.