जिल्हा

मुनघाटे महाविद्यालयाच्या मृदगंध वार्षिककास गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार

AVB NEWS कुरखेडा : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या ‘मृदुगंध ‘या वार्षिकांकास गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे.
हा वार्षिकांक ‘सहकार’ यांवर आधारित असून या पुरस्काराची वितरण येत्या सहा ऑक्टोबरला विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या भव्य समारंभात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे व संपूर्ण संपादक मंडळ यांना गौरविण्यात येणार आहे.सदर अंकाचे प्रकाशन नुकतेच सहकार महर्षी श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे हस्ते करण्यात आले होते.
यापूर्वीही महाविद्यालयाच्या मृदुगंध वार्षिककास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अनेकदा प्रथम तर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या स्थापनेपासून अनेक पुरस्काराने सन्मानित केलेले असून सलग पाचवेळा प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते हे विशेष . यावर्षी सुद्धा विद्यापीठाचा प्रथम पुरस्कार प्राप्त होत आहे . दरवर्षी प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात मृदुगंध विशेषांक वेग -वेगळ्या शीर्षकाखाली प्रकाशित होत असून यापूर्वी कोरोना, पर्यटन, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न लता मंगेशकर ,वन्यजीव व मानव संघर्ष ,कृत्रिम बुद्धिमत्ता अश्या विविध विषयांवर हे वार्षिकांक प्रकाशित झालेले आहेत .
महाविद्यालयाच्या ‘मृदगंध’ या वार्षिककास अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मुंबई द्वारा आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिका स्पर्धा 2021 चा सर्वात्कृष्ट वार्षिककाचा चा प्रथम पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे.
‘सहकार ‘यांवर आधारित मृदगंध वार्षिकांक अतिशय दर्जेदार असून यातील संपूर्ण पृष्ठ रंगीत , सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार , गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ,आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे डॉ .सतीश गोगुलवार, सृष्टी संस्थेचे केशव भाऊ गुरुनुले, तसेच सुप्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, पक्षितज्ञ मारोती चितमपल्ली, अशोक सराफ, जाकीर हुसेन इत्यादींवर विद्यार्थ्यांनी आप- आपले लेख, कविता लेखन केलेले असून हा अंक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात मुख्य संपादक प्रा. डॉ. रवींद्र विखार, सहाय्यक संपादक डॉ.भास्कर तृपटे,डॉ. दशरथ आदे ,प्रोफेसर नरेंद्र आरेकर, प्रा.डॉ. गुणवंत वडपल्लीवार , आशिष बगमारे, सतीश मुनघाटे , श्रेयस टेंभुर्णे, कल्याणी उईके यांनी संपादक मंडळात कार्य केलेले आहे.
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी ,स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी , पालक सभेचे सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी ,सर्व प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केलेले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.