सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते मुनघाटे महाविद्यालयाच्या मृदुगंध वार्षिकांकाचे विमोचन
AVB NEWS कुरखेडा: दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा मृदंगध वार्षिकअंकाचे विमोचन सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, मुख्य संपादक डॉ. रवींद्र विखार, संपादक मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. भास्कर तुपटे , डॉ. गुणवंत वडपल्लीवार डॉ.संजय महाजन ,कु. योगिता खंडाईत इत्यादींच्या प्रमुख उपस्थित गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयातील सभागृहात नुकतेच संपन्न झाले .
याप्रसंगी सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले की, सहकारावर आधारित मृदूगंध हा वार्षिकांक अतिशय दर्जेदार असून त्याचे मुखपृष्ठ, चित्रे ,अक्षराचा आकार,शब्दांची मांडणी, बांधणी ,महाविद्यालयाची गौरवमुद्रा , इत्यादी वाखाण्याजोगी आहेत. उत्तम व दर्जेदार वार्षिकअंकाची निर्मिती केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे व संपूर्ण संपादक मंडळ यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की , 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने सहकार वर्ष म्हणून घोषित केले. ‘ सहकार’ हा मुख्य विषय घेऊन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार लेखणीतून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत दर्जेदार लेख, कविता ,चुटकुले लिहून आपल्या अंगी असणाऱ्या लेखन कौशल्याला अभिव्यक्त केलेले आहेत.
महाविद्यालयाच्या मृदगंध वार्षिक अंकाला सलग पाच वर्षांपासून गोंडवाना विद्यापीठाचा प्रथम पुरस्काराने सन्मानित असून अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मुंबईचा राज्यस्तरावरील प्रथम पारितोषकासाठी मृदुगंध या वार्षिक अंकाची निवड झालेली होती .ही बाब केवळ महाविद्यालयासाठीच नव्हे तर दंडकारण्य संस्थेसाठी अतिशय गौरवाची व अभिमानाची बाब आहे.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. नरेंद्र आरेकर तर उपस्थित आभार डॉ. रवींद्र विखार यांनि मानले .