भाजपा महिला आघाडीने केला काॅंग्रेसचा निषेध * मातृशक्तीचा अपमान कदापी सहन करणार नाही, महिला कार्यकर्त्यांनी दिला इशारा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- काॅंग्रेसने बिहार विधानसभा निवडणूकीचा मुददा पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातेविषयी अपशब्द वापरून मातृशक्तीचा अपमान केल्याचा आरोप भाजपा महिला आघाडीने करीत जिल्हाध्यक्षा तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात काॅंग्रेसच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. देशातील मातृशक्ति ही कॉंग्रेसचे विष कधीही सहन करणार नाही. मातृशक्तीचा अपमान कदापी सहन करणार नाही, असा इशाराही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसला दिला
या निषेधआंदोलनात सहभागी भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिवरेखाताई डोळस, भाजपा जिल्हा महामंत्री गीताई हिंगे, राज्य परिषद सदस्य डॉ. चंदा कोडवते, भाजप जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, महिला आघाडी जिल्हा महामंत्री अर्चनाताई बोरकुटे, प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका वैष्णवी ताई नैताम, लताताई लाटकर, नीता उंदीरवाडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविता उरकुडे, जिल्हा सचिव. अर्चना चन्नावार, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सीमा कन्नमवार, महिला आघाडी च्या भूमिका बर्डे, गीता कुढमेथे, अर्चना निंभोळ, रश्मीताई बाणमारे, वर्षा कन्नाके, सुरेखा कंचर्लावार, भूषणा खेडेकर, भारती खोब्रागडे.सहभागी झाल्या होत्या