स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने सामोरे जावे : कॉंग्रेसच्या नेत्यांचे आवाहन* गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक

AVB NEWS गडचिरोली :–
काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य, गोरगरीब, शोषित, पीडित आणि वंचितांच्या हक्कासाठी सदैव लढा देणारा पक्ष आहे. देशाच्या उभारणीत काँग्रेसचे ऐतिहासिक योगदान असून हे योगदान प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वीकारावी, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीस सर्वांनी एकजुटीने सामोरे जावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक महाराजा सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे पार पडली.
बैठकीस गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदासजी मसराम, माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हा निरीक्षक तथा आरमोरी विधानसभा निरीक्षक ऍड. सचिन नाईक, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, अहेरी विधानसभा निरीक्षक संतोषजी रावत, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटाराम तलांडी, माजी जि. प. अध्यक्ष व प्रदेश सचिव अजय कंकडलावर, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव हनुमंतू मडावी, युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी जि. प. उपाध्यक्ष व कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, काँग्रेस नेते जेसाभाऊ मोठवानी यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, सेल अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.