नवरात्रीपूर्वी आरमोरी शहर खड्डेमुक्त करा – मिलिंद खोब्रागडे

AVB NEWS आरमोरी :- शहरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळ्यानंतर शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ परिसर, शासकीय दवाखाना, बसस्थानक रोड, शाळा-कॉलेज परिसर तसेच भागातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज हजारो नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नवरात्रीचा उत्सव काही दिवसांवर आला आहे. या काळात देवीदर्शनासाठी शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व यात्रेकरूंची गर्दी होते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गर्दीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यांची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे.
वाहनचालक, पादचारी, शालेय मुले, वृद्ध नागरिक यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी तर खड्ड्यामुळे रस्ताच अदृश्य झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
खोब्रागडे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, नवरात्रीपूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजवले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. शहरातल्या सामाजिक संघटना, व्यापारी व विद्यार्थी यांनी देखील या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.आरमोरी शहरातील मेन रोड ते नेहरू चौक.विठ्ठल मंदिर ते पटेल चौक. राम मंदिर ते विठ्ठल मंदिर. मेन रोड ते माजी आमदार हरिरामजी वरखडे यांच्या घराकडील रोड. काळगोटा कडे जाणारा रोड अश्याप्रकारे शहरातील अनेक रोड. “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी. अन्यथा सणाच्या काळात रस्त्यावर उतरावे लागेल,”त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पावसाळ्यानंतर झालेले खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे केलेली आहे.