जिल्हा

माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी प्रॉपर्टीकार्ड बाबत वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष ! गडचिरोली जिल्ह्यातील  झोपडपट्टी, आतिक्रमणधारकांना स्थाई पट्टे  द्या  

AVB NEWS गडचिरोली:- सन 1982 रोजी गडचिरोली जिल्हा निर्माण झाल्याने गडचिरोली शहर व ईतर तालूकास्थानी शहराच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या महसूल, झुडपीजंगल व सींचाई विभागाच्या जागेवर अतीक्रमण करून नागरीक अस्थाई वास्तव्य करीत आहेत. केन्द्र व राज्य सरकारने अशा लोकांना घरकुल मंजुर केलेले आहे परंतू मागील 40 ते 45 वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या झोपडपट्टी धारकांना स्थाई पट्टा देण्यात आलेला नाही. त्यामूळे गोरगरीबांना नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात घरकूल बांधकाम करता येत नाही. हा विषय घेउन  माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी  यांनी . मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस व महसुलमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्याषी या विषयावर चर्चा केली त्यानुसार मुख्यमंत्री यांनी तात्काळ बैठक बोलविण्याचे निर्देष जिल्हाधीकारी यांना पत्राद्वारे सुचित केले आहे

त्यावेळेस भाजपा शहरअध्यक्ष, माजी नगरसेवक अनील कूनघाडकर, किसान सेल चे सचीव रमेश भूरसे, माजी सभापती चंद्रशेखर भडांगे भाजपा कार्यकर्ता अविनाष विश्रोजवार, निवृत्त तहसीलदार पुष्पा कुमरे, भाजप शहर महामंत्री हर्शल गेडाम व ईतर मान्यवर उपस्थीत होते.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.