२५ गणेश भक्तांनी रक्तदान करून घडविले सामाजिक बांधीलकीचे दर्शन * गोकुळनगरातील युवा गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

एव्हीबी न्यूज गडचिरोली :-
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ हे ब्रिद जोपासात रक्तदान केल्याने रक्ताची गरज असलेल्या रूग्णांना जीवनदान मिळते हे लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील गोकुळनगर वार्ड क्रमांक 23 येथील युवा गणेश मंडळाच्या वतीने आज ४ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मंडळाच्या सदस्य व गणेशभक्त अशा 25 रक्तदात्यांनी स्वेच्छेन रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले. तसेच रक्तदान करण्यासाठी युवकांनी सदैव पुढे यावे, असे आवाहन सुध्दा युवा गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले.
रक्तदात्यांमध्ये युवा गणेश मंडळाचे सागर भांडेकर, वैभव वडेट्टीवार, हरिश बोनमपल्लीवार, रोशन बांबोळे, अमित नन्नावरे, निलेश पारेकर, आकाश बघेल, रोविकांत दुधबावरे, सुचित अलपुलवार, रोहित सादूलवार, अनिरूध्द वडेट्टीवार, ओमराज वासेकर, शुभम कोत्तावार, विशाल देशमुख, चेतन सुर्यवंशी, गौरीश उईके, रूपेश दंडकीवार, विशाल जेंगठे, आकाश सादूलवार, उध्दव रोहनकर, सचिन टिंगुसले, पुथल वनकर, रांजन बांबोळे यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराला आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
रक्तदान शिबिराला रामू महातो, राजू महातो, नितीन नैताम, सुमेध पफुलझेले, निखील मेश्राम, गड्डू सय्यद, संजय उसेंडी, शुभम भांडेकर, दर्शन कोसरे, शुभम वानखेडे, आशिश ठाकरे, राज ठाकरे, योगेश अंडेल, बंटी भरटकर, पंकज सातपुते होमगार्ड शत्रूघ्न ठाकरे, मंगला कांबळे, प्रमोद मेश्राम