सरकारचा प्रतिनिधी आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही * राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकार्यांचा ईशारा

AVB NEWS नागपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ३० ऑगस्ट पासून नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत साखळी उपोषण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर याचे प्रमुख उपस्थितीत सुरू केले आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने सरकारचा प्रतिनिधी आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असा ईशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिला आहे.
मराठा जातीचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येऊ नये व सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या ज्शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी. ओबीसी मुलांना व्यावसायीक अभ्यासक्रमास १०० टक्के शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी. गुणवंत मुलांमुलीना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती ७५ विद्यार्थ्यांची संख्या वाढवुन २०० विद्यार्थी करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आज पाचव्याही दिवशी उपोषण सुरूच होते.
राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे संविधान चौकात सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सुनील सवाई, किरण नेरकर, वसंतराव राऊत, विजय ठाकरे, ओमकार चौधरी, रत्नाकर लांजेवार, बाबासाहेब भोयर, यांनी सहभाग नोंदवला.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाला आज आ. डॉ. परिणय फुके, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रा . शेषराव येलेकर, प्रकाश साबळे, राहुल तायडे, प्रवीण वानखेडे, अनिल ठाकरे, गुणेश्वर आरीकर, सोनोने , अनिल कंठीवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा गडचिरोलीचे जिल्हा सचिव सुरेश भांडेकर, पुरुषोत्तम मस्के, प्रा. त्र्यंबक करोडकर, वासुदेव कुडे , उमेश आखाडे, पांडुरंग नागापुरे,घनश्याम जकुलवार,युवा अध्यक्ष राहुल भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा मंगला कारेकर, युवती अध्यक्ष संतोषी सूत्रपवार, महेंद्र लटारे, प्रफुल आंबोरकर,संदीप चापले, पंकज खोबे, अंकुश मोगरकर, आरमोरी येथील चेतन भोयर,मिथुन शेबे, आकाश सोनटक्के सह नागपूर, अमरावती, चंद्रपूर, व गडचिरोली या जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते हजर होते.