जिल्हा
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे खाजगी स्वीय सहाय्यक तुषार सातपुते यांचे अपघाती निधन

गडचिरोली :- माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचे खाजगी स्वीय सहाय्यक तुषार सातपुते रा. खंडाळा (ता. चामोर्शी) यांचे नागपूर येथील एम्स रूग्णालयात उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. दोन दिवसापूर्वी सातपुते हे चामोर्शी मुल मार्गावर झालेल्या रस्ते अपघातात गंभिर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूरात उपचार सुरू होते. काल मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास निधन झाले.
तुशार सातपुते हे मृदू व शांत स्वभावाचे व्यक्तीमत्व होते. ते माजी आ. डॉ. देवराव होळी यांचे विश्वासू साथीदार तथा खाजगी स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी मार्कंडा वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.