मुनघाटे महाविद्यालयाची श्रुतीका कांबळे सेट परीक्षा उत्तीर्ण

AVB NEWS कुरखेडा : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थिनी श्रुतीका रोमेश्र्वर कांबळे हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे आयोजित भूगर्भशास्त्र विषयातून सेट 2025 परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
. श्रुतीका हिने सन 2019 मध्ये मुनघाटे महाविद्यालयातून विज्ञान स्नातक पदवी घेतली व नांदेड विद्यापीठातून भूगर्भशास्त्र विषयात M. Sc. ( भूगर्भशास्त्र) ची पदवी प्राप्त केली. महाविद्यालय भूगर्भशास्त्र विभाग अतिशय समृद्ध असून यापूर्वीही महाविद्यालयातील भूगर्भ शास्त्र विषयाचे अनेक विद्यार्थी नेट- सेट झालेली आहेत तसेच राज्यातील व देशातील विविध ठिकाणी भू- वैज्ञानिक म्हणून काम करीत आहेत.
महाविद्यालयात मोफत वाय-फाय सेवा ,एन. डी .एल .व डिजिटल ग्रंथालय, ग्रंथालयात असणारी विविध पुस्तके व मासिके, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांची प्रेरणा व डॉ वडापल्लीवार यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन यामुळे आपल्याला हे यश मिळाल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशि वार्तालाप करताना दिले.
तीने आपल्या यशाचे श्रेय पालक श्री रोमेश्वर कांबळे व आई रेखा कांबळे सोबतच श्री गोविदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, मार्गदर्शक प्राध्यापक भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांना दिलेले आहे.