जिल्हा
प्रतिक राठींची भाजपा उद्योग आघाडीच्या जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- चामोर्शी येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते प्रतिक राठी यांची भाजपा उद्योग आघाडीच्या जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती भाजपा औद्योगीक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी केली आहे. प्रतिक राठी यांची नियुक्ती पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन करण्यात आली आहे. प्रतिक राठी दिलेल्या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून भाजपाची ताकद व संघटनशक्ती वाढवतील, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.