
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- अख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पाचे आज 27 ऑगस्ट रोजी श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी जल्लोषात आगमन झाले.‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ चा जयघोष व टाळ व मृदंगाच्या गजरात घराघरात श्रीगणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
गडचिरोली शहरासह जिल्हयातील ग्रामीण भागात गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. जिल्हयातील 286 गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ सोहळा साजरा केला जात आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठया भक्तीभावने साजरा केला जात असून 481 मंडळांनी नोंदणी केल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदी व भक्तीमय झाले आहे.