तेली समाजाचे संघटन काळाची गरज…! – माजी खा.रामदास तडस यांचे प्रतिपादन * संताजी भवनात बैठक

AVB NEWS गडचिरोली- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महाराष्ट्रातील तेली समाजाला एकत्रित करून त्यांचा हक्क आणि अधिकारासाठी गेल्या चार दशकांपासून कार्यरत आहे. तेली समाजाचे संघटन काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे प्रदेशाध्यक्ष माजी खा. रामदास तडस यांनी केले. गडचिरोली येथील संताजी भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मार्गदर्शन करतांना रामदास तडस पुढे म्हणाले , जातीनिहाय जनगणनेत स्वतंत्र नोंद ठेवावी,मुंबई येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यां करिता वसतिगृहाची सुविधा, शिक्षण व रोजगार आरक्षण देण्यात यावे. श्री.संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाला ५० हजार कोटींच्या निधीची मागणी प्रलंबित आहे. समाजाच्या या मागण्या सोडविण्यासाठी आणि हक्कासाठी लढा तीव्र करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महासचीव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष नाना शेलार, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष पोपटराव गवळी, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, नागपूर विभागीय महिला आघाडी उपाध्यक्षा योगिता पिपरे, महाराष्ट्र प्रांतिकचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा संघटक रमेश भुरसे, प्राचार्य पि.आर.आकरे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा लता कोलते, विधी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अँड.पत्रु घोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, मधुकर भांडेकर, विजय सुपारे, विलाससोमणकर, सचिव लाला सातपुते, दिलीप चलाख, मनोहर चलाख, राम वैद्य, भास्कर बोडणे, मुक्तेश्वर काटवे व मोठ्या संख्येने तेली समाज बांधव उपस्थित होते.
प्रमोद पिपरे नुकतेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे या शिखर संस्थेवर संचालक म्हणुन निवडुन आले. तसेच प्रा.रमेश बरसागडे यांची भाजपा जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे या दोघांचाही सत्कार समाजाचे भूषण म्हणुन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पिपरे , संचालन प्रतिभा खोब्रागडे व आभार मधुकर भांडेकर यांनी मानले.