जिल्हा

जिल्हा वर्धापन दिन विशेष **  ………..जीडीसीसी बॅंक एका छोटया रोपटयाचे झाले वटवृक्षात रूपांतर !

 

जिल्हा वर्धापन दिन विशेष **
………..जीडीसीसी बॅंक एका छोटया रोपटयाचे झाले वटवृक्षात रूपांतर !

जिल्हयाच्या विकासात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे महत्वपुर्ण योगदान
गडचिरोली जिल्हयाच्या निर्मितीला आज 43 वर्ष पुर्ण झाली. गडचिरोली जिल्हयाच्या विकासात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा सिंहाचा वाटा आहे. ही बॅंक जिल्हयाच्या आर्थिक विकासाचा कणा बनली आहे, जिल्हयाच्या ज्या भागात राष्ट्रीयकृत बॅंकेची सुविधा पोहचली नाही अशा दुर्गम भागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने शाखा उघडून नागरिकांना बॅंकींग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज ही बॅंक शेतकरी, महिला बचत गटांसाठी विकासाचे दालन ठरली असून बॅंकेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. राज्यभरातील विकसीत जिल्हयातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका डबघाईस आल्या असतांना गडचिरोली सारख्या अविकसीत आर्थिकदृश्टया मागासलेल्या आदिवासी जिल्हयातील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहकार क्षेत्रात विकासाची किमया साधली आहे, याचे श्रेय बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष, मार्गदर्शक व सहकार क्षेत्रातील किमयागार अरविंद सावकार पोरेड्डीवार यांना द्यावे लागेल.

अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी बॅंकेच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्यांचे पुत्र आणि बॅॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात बॅंकेच्या यशाची घौडदौड सुरू आहे. बॅंकेच्या वाटचालीचा इतिहास लक्षात घेता ज्ञानेश्वराने रचला पाया अनू तुकोबाने चढविला कळस असेच म्हणावे लागेल.
26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्हयाचे विभाजन होउुन गडचिरोली जिल्हयाची निर्मिती झाली. जिल्हा निर्मितीनंतर 8 नोव्हेंबर 1985 रोजी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची स्थापना झाली. अल्प व तुटपुंज्या साधनसंपत्तीवर बॅंकेच्या 14 शाखा सुरू करून बॅंकेची वाटचाल सुरू झाली. बॅंकेचे पहिले अध्यक्ष म्हणून अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी बॅंकेचे सुत्रे हाती घेतल्यानंतर बॅंकेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी योजना राबवून बॅंकेच्या विकासाला दिशा दिली. आज बॅकेच्या जिल्हाभरात 55 शाखा असून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही राज्याच्या सहकार क्षेत्रात आर्थिकदृश्टया सक्षम बॅंक म्हणून नावारूपास आली असून बॅंकेची 4 हजार कोटीकडे वाटचाल सुरू आहे.

अरविंद सावकार पोरेड्डीवारांनी बॅंकेची सुत्रे हाती घेतल्यानंतर बॅंकेत सोयी सुविधा वाढविण्याबरोबरच बॅंक नपफयात कशी येईल याचा अभ्यास करून संचालक मंडळाच्या बैठकीत अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. 1992 मध्ये जिल्हयातील 28 सेवा सहकारी संस्थांचे 120 आविका संस्थेत रूपांतर झाले. सन 1997 मध्ये बॅंकेने स्वंय सहायता बचत गटांचे बचत खाते उघडून कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. महाराश्टाच्या सहकार क्षेत्रात सर्वप्रथम बचत गटांना कर्ज पुरवठा करणारी गडचिरोली जिल्हा सहकारी बॅंक म्हणून नोंद झाली. आणि बफंकेने बचत गटासाठी केलेल्या कार्याची दखल घेउुन नार्बाडने सन 2001 02 ते 2007- 08 या अर्थिक वर्शात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ‘उत्कृश्ट कार्यक्षमता’ पुरस्कार देउुन सन्मानित केले. त्यानंतर बॅंकेने मागे कधी वळून बघीतलेच नाही आणि आज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने केलेल्या उल्लेखिनिय कार्याबदल विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दरवर्शी कोणत्या ना कोणत्या पुरस्कारावर बॅंकेची मोहर उमटत आहे यावरून बॅंकेचे यश अधोरेखीत होते. बॅंकेचे आधारस्तंभ अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी लावलेल्या बॅंकरूपी एका छोटया रोपटयाचे रूपांतर आता मोठया वटवृक्षात झाले आहे. ही किमया अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन आणि बॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार यांच्या कल्पक नेतृत्वामुळेच साध्य झाली आहे. कोणतेही कार्य करतांना दृरदृश्टी, जिद्द, चिकाटी, अभ्यासूवृत्ती बाळगूण नियोजनबध्दरित्या सकारात्मदृश्टीने वाटचाल केल्यास यशोखिर निश्चित गाठता येते, असा संदेश गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिला असून हेच बॅंकेच्या यशाचे गमक म्हणावे लागेल.

बॅंकेने स्विकारले आधुनिक तंत्रज्ञान; बॅंक बनली शेतकरी बांधवांचा आधारस्तंभ

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही गडचिरोली जिल्हयातील शेतकरी बांधवांचा आंधारस्तंभ म्हणून ओळखली जाते. शेतकर्यांना सर्वाधीक पीक कर्ज पुरवठा केला जातो. त्याचबरोबर महिला बचत गट आणि सुशिक्षीत बेरोजगारांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज उपलब्ध करून आर्थिक पाठबळ देण्याचे काम ही बॅंक करीत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे जिल्हयात सर्वाधीक खातेधारक असून बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञनाचा अवलंब करीत ग्राहकांना सुलभ सुविधा दिली जात आहे. बॅंकेने एटापल्ली भामरागड सारख्या दुर्गम भागातात बॅंकेच्या शाखा सुरू करून बॅंकीग सेवा उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी गोरगरीब नागरिकांना बचतीचे महत्व पटवून दिल्याने आदिवासी बहुल भागात सुध्दा खातेधारकांची संख्या प्रचंड वाढली असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सर्वसामान्यांची बॅंक म्हणून ओळख निर्माण केली आहे. या बॅंकेने राष्ट्रीयकृत बॅंकांना मागे टाकत विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.