गडचिरोलीत पुरामुळे 13 मार्ग बंद, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत* गडचिरोली शहरातील अनेक भाग जलमय* आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी केली पाहणी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- जिल्हयात मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अतिवृष्टी आणि पुरामुळे आज मंगळवारी सायंकाळ पर्यंत 13 मार्ग बंद झाले आहेत. पुरामुळे काही भागातील पिके पाण्याखाली सापडली आहेत. मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक भाग जलमय झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आ.डॉ. मिलींद नरोटे यांनी केली पाहणी
पुरामुळे बंद असलेले मार्ग
1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग-130 डी (पर्लकोटा नदी) तालुका भामरागड
2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी
3) तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-381(पोहार नदी)तालुका चामोर्शी
4)कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग-377 (सती नदी) तालुका कुरखेडा
5) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा-53 स्थानिक नाला) तालुका चामोर्शी
6) काढोली ते उराडी रस्ता प्रजिमा-7(स्थानिक नाला) तालुका कुरखेडा
7) शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता प्रजिमा-1 तालुका देसाईगंज
8) कोकडी ते तुलशी रस्ता प्रजिमा -49 तालूका देसाईगंज
9) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता प्रजिमा-47 तालुका देसाईगंज
10) पोरला वडधा रस्ता प्रजिमा-7 तालुका कुरखेडा
11) भेंडाळा बोरी गणपूर रस्ता प्रजिमा-17 (हळदीमाल नाला
12) हलवेर ते कोठी रस्ता इजीमा-24 तालुका भामरागड
13) गडचिरोली चांडाळा गुरवळा रस्ता राज्यमार्ग-379 तालुका गडचिरोली