श्रावणी महोत्सवातून देशोन्नतीच्या ‘मनस्विनीनी’ केली कला गुणांची उधळण ! मनस्विनी मंच महिलांचे हक्काचे व्यासपीठ : सिनेट सदस्य तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- देशोन्नती व महिलांच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या मनस्विनी मंचचा वर्धापन दिन सोहळा सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे थाटात संपन्न झाला. यावेळी 111 मनस्विनी श्रावणी महोत्सवातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. रेट्रो थीम सोलो डान्स व राधा -कृष्णा ग्रुप डान्स चे आयोजन सुद्धा करण्यात आले होते..मनस्विनीनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करीत आपल्या कलणागुणांची उधळण केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन खा. डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. मिलींद नरोटे, आ. रामदास मसराम, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी प्रा. अनिल धामोडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,मनस्विनी मंच जिल्हा संयोजिका सुलभा धामोडे,प्रा. राजेश कात्रटवार,प्रसिद्ध गायिका श्रेया खराबे, TVS सुझुकीच्या संचालिका वैभवी विश्राम होकाम, प्रसिद्ध साहित्यिका कुसुम आलाम,वैशाली नरोटे ,आधार विश्व फॉउंडेशन च्या अध्यक्ष गीता हिंगे,शीतल सोमनानी,काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविता मोहोरकर,भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा माजी नागराध्यक्ष योगिता पिपरे राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या अध्यक्ष डॉ. सोनल कोवे, बँक मॅनेजर वैशाली सतीश विधाते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
यावेळी मनस्विनी पुरवणी मध्ये लिखाण करणाऱ्या उत्कृष्ठ मनस्वीनींचा ‘सन्मान स्त्री शक्तीचा, गौरव मायमाऊलीचा’ या उपक्रमांतर्गत सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेट सदस्या व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री धर्मराव बाबा आत्राम यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी देशोन्नती समूह व मनस्विनी मंच च्या कार्याचे कौतुक केले. मनस्विनी मंच महिलांचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांनी केले