रविवारी गडचिरोलीत मनस्वीनींचा भव्य श्रावणी महोत्सव *रेट्रो थीम व सामूहिक नृत्यात तब्बल 121 मनस्वीनींचा सहभाग

AVB NEWS गडचिरोली : देशोन्नती व मनस्विनी मंच च्या वर्धापन दिनानिमित्त रविवार 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात मनस्विनींचा भव्य श्रावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात तब्बल 121 मनस्वीनींनी रेट्रो थीम फॅशन शो व राधा -कृष्ण ग्रुप डान्स मध्ये सहभाग नोंदविला आहे.
मनस्विनी मंच तर्फे वर्षेभर महिलांसाठी विविध साहित्यिक,बौद्धिक व सांस्कृतिक उपक्रम राबविल्या जातात. श्रावणी महोत्सवानिमित्य दरवर्षी वेगवेगळी थीम देण्यात येते. यावर्षी गोकुळाष्टमी निमित्त राधा -कृष्ण ग्रुप डान्स व 1990 च्या दशकापूर्वीची रेट्रो थीम फॅशन शो (सोलो डान्स ) आयोजित करण्यात आला आहे.
‘सन्मान स्त्री शक्तीचा,गौरव माय माऊलीचा’ या उपक्रमांतर्गत वर्षभर मनस्विनी पुरवणी मध्ये लिखाण करणाऱ्या साहित्यिक मनस्विनींचा सत्कार सोहळा यावेळी पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन खा. डॉ. नामदेवराव किरसान करणार असून विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध गायिका श्रेया खराबे, प्रा. राजेश कात्रटवार, महेंद्र ब्राम्हणवाडे,वैभवी विश्राम होकम, शीतल बलराम सोमनानी, माजी नागराध्यक्ष तथा भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष योगिता पिपरे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविता मोहोरकर, वैशाली मिलिंद नरोटे, आधार च्या अध्यक्ष गीता हिंगे, राका महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सोनल कोवे, स्त्री शक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष छायाताई कुंभारे, शाखा व्यवस्थापक डॉ. वैशाली विधाते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समरोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, आ. डॉ. मिलिंद नरोटे, आ. रामदास मसराम उपस्थित राहणार आहेत.
या संस्कृतीक महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मनस्विनी मंचच्या जिल्हा संयोजिका सुलभा धामोडे, कोअर कमिटी सदस्य प्रा. संध्या येलेकर, प्रा. डॉ. विना जंबेवार, प्रा. सुनिता साळवे, प्रा. विजया मने, रजनी कुंभारे, मनीषा महात्मे, डॉ. दीप्ती वैद्य,, शिल्पा गुड्डेवार,गायत्री सोमणकर, अरुणा गोहणे व सुषमा मडावी यांनी केले आहे.