जिल्हा
काँग्रेसच्या वतीने उद्या ‘कॅन्डल व मशाल मार्च’

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भाजपाने निवडणूक आयोगावर दबाब, मतदार यादीमध्ये घोटाळे व मतचोरी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने उद्या 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालय ते इंदिरा गांधी चौकापर्यंत ‘कॅन्डल व मशाल मार्च’ काढण्यात येणार आहे. याप्रसंगी काँग्रेसचे आजी माजी खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.