जिल्हा

उदय धकाते यांची  ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्षपदी  निवड

गडचिरोली प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हाध्यक्ष पदावर सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक हक्कांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने कार्य करणाऱ्या उदय धकाते यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.

गडचिरोली येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतची सभा प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रांत संघटन मंत्री अभय खेडकर, प्रांत सचिव चारुदत्त चौधरी, संतोष डोमाळे, साकोषाध्यक्ष, जितेंद्र बंगले, सहसचिव, यवतमाळ,प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक प्रकाश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदय धकाते यांनी जिल्हा सचिवपदाची जबाबदारी सांभाळताना जिल्हा व राज्यस्तरावर ग्राहकांच्या समस्यांवर भक्कम भूमिका घेतली. त्यांच्या प्रभावी कार्यामुळे राष्ट्रीय स्तरावर गडचिरोली ग्राहक पंचायतची ठळक ओळख निर्माण झाली. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांनी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. नवी कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे :

जिल्हा कार्यकारिणी :

अध्यक्ष – उदय धकाते

उपाध्यक्ष – विजय साळवे, डॉ. महेश जोशी

सचिव – अरुण पोगळे

सहसचिव – सौ. विद्या श्रीराम जवळे, नरेश कहूरके

कोषाध्यक्ष – अनंता माकोडे

महिला आयाम प्रमुख – सौ. सुचिता उदय धकाते

मार्गदर्शक – प्रकाश पाठक

केंद्र कार्यालय प्रमुख – विजय कोतपल्लीवार

प्रचार प्रमुख – सौ. जोत्स्ना कापूरकर

विधी आयाम प्रमुख – ॲड. नीलकंठ भांडेकर

पर्यावरण प्रमुख – डॉ. देवेंद्र मुनघाटे

रोजगार सृजन प्रमुख – सौ. भारती स्वरूप तारगे

IT सेल जिल्हा प्रमुख – अमित साखरकर

कार्यकारिणी सदस्य :
डॉ. किशोर वैद्य, सौ. सुनीता विजय साळवे, सौ. शालिनी निंबारते, सौ. आशा आनंदराव कोकोडे, सौ. नीलिमा देशमुख, सौ. मेघा विजय कोतपल्लीवार, मनसुखलाल मेश्राम, बळवंतराव येवले, राजू सत्यनारायणराव गुब्बावार, साक्षी प्रकाश भांडेकर, अमित हस्ते यांची निवड करण्यात आली आहे.

कोट :-
“गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही ग्राहकाची व्यापारी किंवा अन्य विभागातून, व्यक्ती कडून फसवणूक झाल्यास त्यांनी निर्धास्तपणे पुढे येऊन ग्राहक पंचायतकडे तक्रार नोंदवावी. ग्राहकांच्या हक्कांसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”
— उदय धकाते, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा गडचिरोली.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.