चार विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या ट्रकचालकास पोलीसांनी छत्तीसगड मधून घेतले ताब्यात

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- काटली येथील अपघातात चार विद्यार्थ्यांचा बळी ट्रकचालकाचा पोलीसांनी शोध लावला असून त्यास ताब्यात घेतले आहे. ट्रकचालकाला वाहनासह छत्तीसगड राज्यातून ताब्यात घेतले आहे. प्रविण बाळकृश्ण कोल्हे (26) असे आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. त्याचबरोबर सहचालक सुनिल श्रीराम मारगाये (47) रा.चिचगड जिल्हा गोंदिया याला सुध्दा ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हा अत्यंत गंभिर स्वरूपाचा असल्याने घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास
पथके तयार करण्यात आली होती. पोलीस पथकांनी प्रत्यदर्शी साक्षीदार, सिसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्याच्या मदतीने टकचा निपुणतेने शोध घेतला. तसेच न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा नागपूर येथील पथकाकडून मदत घेण्यात आली. प्रकरणाचा अधिक तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हान करीत आहेत.