ताज्या घडामोडी
आरमोरीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभिर जखमी* * बेजबाबदार इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनावर गुन्हे दाखल करा * शेतकरी कामगार पक्ष व आझाद समाज पक्षाची मागणी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- आरमोरीत मोडकळीस आलेले इमारत कोसळून तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू तिघे गंभिर जखमी झाल्याची दुदैवी घटना आज 8 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
आरमोरी येथे जूनी इमारत कोसळून तीन जणांचा जागीच मृत्यू व तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. इमारती मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निष्पाप लोकांचा बळी गेला. याला सर्वस्वी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांचे विरोधात हत्येचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, शामसुंदर उराडे, जयश्रीताई जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे.