जिल्हा

लॉईड्स मेटल्स ने उपलब्ध करून दिले अपघातातील जखमींसाठी हेलिकॉप्टर

AVB NEWS गडचिरोली :- मार्निंगवॉक साठी गेलेल्या शाळेकरी बालकांना अज्ञात टकने चिरडल्याने या अपघातात चौघांचा मृत्यू, तर दोघे गंभिर जखमी झाल्याची घटना आज 7 ऑगस्ट रोजी आरमोरी गडचिरोली महामार्गावर सकाळच्या सुमारास घडली.

जखमींवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते आणि त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे कळताच, लॉईड्स मेटल्स तर्फे तत्काळ स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले –
लॉईड्स मेटल्स ने ह्यापूर्वीसुद्धा सामाजिक जाणिवेचा परिचय देत हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले होते. नुकतेच 2 ऑगस्ट रोजी, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन ह्यांनी स्वतः हेलिकॉप्टरने हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस नाईक श्री. राहुल गायकवाड ह्यांना हेडरी हून नागपूरला उपचारासाठी पोहचविले होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.