काटली येथील अपघाताच्या घटनेने सर्वत्र हळहळ * मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक

गडचिरोली :- आरमोरी-गडचिरोली महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाला असून ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी मृत युवकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे स्पष्ट केले आहे.
गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडले. त्यात दोघे जागीच ठार झाले तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले असून या घटनेनंतर काटली गाववासियांनी तब्बल 5 तास नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान गडचिरोली च्या दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे 5 तासानंतर येथील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. मात्र, अपघातात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
आरमोरी-गडचिरोली महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी तातडीने अपघात स्थळी भेट दिली व मृत्यूमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तत्पूर्वी त्यांनी एमआयडीसी हेलिपॅड येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोन जखमींना नागपूर येथे हेलिकॉप्टरने पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान अनेक ग्रामस्थ भावनिक अवस्थेत होते. अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांशी मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी थेट संवाद साधला. त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले. “दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
शासनाकडून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करण्यात येईल व दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
गावकऱ्यांनीही या वेळी आपल्या व्यथा मांडल्या आणि महामार्गावरील वाहतुकीच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली.
मृतकांना श्रद्धांजली
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार युवकांना मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे सभागृहात दोन मिनिटाचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून चार लाख रुपये मदत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षण विभागाने अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा नियमाप्रमाणे देय लाभ मृतांच्या परिवाराला तात्काळ मिळवून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
गडचिरोली-नागपूर मार्गावरील काटली गावात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडले. त्यात दोघे जागीच ठार झाले तर दोघांचा गडचिरोलीच्या रुग्णालयात मृत्यू झाला. दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आले असून या घटनेनंतर काटली गाववासियांनी तब्बल 5 तास नागपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. दरम्यान गडचिरोली च्या दौऱ्यावर असलेले शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांची समजूत काढली. त्यामुळे 5 तासानंतर येथील वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे, या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव भांड्याप पडला. मात्र, अपघातात चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.