जिल्हा

खासदार डॉ. किरसान यांनी गडचिरोलीत इंजिनिअरींग कॉलेज व केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याची केली मागणी  * केंद्रीय शिक्षण मंत्री धमेंद्र प्रधान यांची घेतली भेट

AVB NEWS गडचिरोली:- 
चिमूर लोकसभा क्षेत्राचे  खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सह अभियांत्रिकी महाविद्यालय व अतिरिक्त नवोदय विद्यालय स्थापन करण्याची मागणी केली व त्या संदर्भात निवेदन दिले.

गडचिरोली हा महाराष्ट्रातील एक अतिदुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा असून, येथील मुलभूत शैक्षणिक सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणाकरीता दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात . परिणामी, त्यांच्यावर आर्थिक, मानसिक व सामाजिक ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यांसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गडचिरोली जिल्ह्यात नितांत गरज आहे. यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक क्षमतेचा विकास होईल. त्याचप्रमाणे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्यामुळे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नागपूर, चंद्रपूर किंवा इतर जिल्ह्यात जावे लागतो. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केल्यास, स्थानिक तरुणाईला त्यांच्या जिल्ह्यातच उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होईल. अशी मागणी खासदार डॉ. किरसान यांनी शिक्षण मंत्री यांच्याकडे केली.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खासदार डॉ. किरसान यांची मागणी गांभीर्याने ऐकून घेतली. व जिल्ह्याच्या शैक्षणिक गरजांबाबत संवेदनशीलतेने प्रतिक्रिया दिली या भेटीद्वारे गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, लवकरच या मागण्यांवर केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी व्यक्त केला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.