भाजपा औद्योगीक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी आकाश अग्रवाल यांची फेरनिवड

एव्हीबी न्यूज गडचिरोली – भाजपाच्या जिल्हास्तरावरील विविध आघाडी व सेलच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया नुकतीच पार पडली. भाजपा जिल्हा औद्योगीक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी वडसा येथील प्रतिष्ठीत व्यापारी तथा भाजपाचे कुशल व सामाजिक कार्यकर्ते आकाश अग्रवाल यांची फेरनिवड करण्यात आली आहे. आकाश अग्रवाल यांनी यापुर्वी केलेले उल्लेखनिय कार्य लक्षात घेऊन त्यांची पुन्हा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांनी नुकतेच विविध पदाधिकार्यांची कार्यकारीणी जाहीर केली.
भाजपा औद्योगीक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने आकाश अग्रवाल यांनी आपल्या निवडीचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस, विधान परिशदेचे आमदार डॉ. परिणय फुके, माजी खा. अशोक नेते, माजी आ. कृष्णा गजबे व भाजपाच्या वरिष्ठ पदाधिका्यांना दिले आहे. आकाश अग्रवाल यांच्या निवडीबद्दल भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवारांनी शुभेच्छा दिल्या आहेत- भाजाने जिल्हा औद्योगीक आघाडीची जबाबदारी सोपविल्याने पक्षसंघटनशक्ती वाढविण्याबरोबरच जिल्हयातील औद्योगीक समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे स्पष्ट केले आहे.