जिल्हा

सुरक्षारक्षकांचे वेतन तातडीने द्या, अन्यथा ठिया आंदोलन छेडणार  * असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांचा इशारा  * जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदन देऊन वेधले लक्ष

AVB NEWS गडचिरोली  :- जिल्हयातील आरोग्य विभागातील कार्यरत सुरक्षा रक्षकांचे वेतन मागील तीन महिन्यापासून प्रलंबीत असून ते तातडीने देण्यात यावे, अशी मागणी असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या 7 दिवसात सुरक्षारक्षकांना वेतन न मिळाल्यास 16 ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयातसमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पेंदोरकर यांनी दिला आहे.

कुणाल पेंदोरकर यांनी निवेदना स्पश्ट केले आहे की, गडचिरोली जिल्हयात सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतर्गत जिल्हा सामान्य रूग्णालय, महिला व बाल रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व तालुकास्तरावरील ग्रामीण रूग्णालयात सुरक्षा रक्षक तुटपुंज्या वेतनावर दिवस रात्र सुरक्षा सेवा देत आहेत. सुरक्षारक्षक केवळ सुरक्षेची जबाबदारी पार पाडीत नाहीत तर त्याव्यतिरिक्त रूग्णालयाच्या गेटवर रूग्णवाहिकेतून रूग्णाला ‘स्टेचर’ वर व्हिलचेअर’वर रूग्ण नेण्याची जबाबदारी सुध्दा पार पाडतात. तसेच कॉलसेंटरची जबाबदारी ते सांभाळतात. तसेच इतर कामे करून घेतली जातात. तरी ते सेवाभावाने रूग्णसेवेचे काम करीत आहेत. परंतू या सुरक्षा रक्षकांना मागील तीन महिन्यापासून वेतन मिळाले नाही. वेतन नियीमत न देणे म्हणजे एक प्रकारे सुरक्षारक्षरक्षकांचे शोशण केल्यासारखेच आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

गडचिरोली जिल्हा रोजगार विरहीत असून असून रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. अशातच ज्या युवकांना सुरक्षा रक्षक म्हणून रोजगार प्राप्त झाला आहे, त्यांना महिनेवारी त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नसेल तर सुरक्षारक्षक व त्यांचे कुटुंबिय जीवन कसे जगणार ? त्यांच्या मुलामुलींचे शिक्षण, घरभाडे, जीवनावश्यक साहित्यावरील खर्च कुठून करणार? असा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील तीन महिन्यापासून सुरक्षा रक्षकांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.

येत्या 7 दिवसात जिल्हयातील सर्व रूग्णालयामध्ये कार्यरत सुरक्षारक्षकांचे वेतन न मिळाल्यास 16 ऑगस्ट पासून कामबबंद आंदोलन करतील तसेच सुरक्षारक्षकांच्या मागणीच्या पुर्ततेसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयासमोर असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असंघटीत कामगार कर्मचारी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर जिल्हा शल्यचिकीत्सकांना निवेदनातून दिला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किलनाके  वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष मेश्राम, कार्यालयीन अधीक्षक महेशगौरी यांना निवेदन देण्यात आले

निवेदन देतांना सुरक्षा रक्षक विकास काबेवार  निखिल लाडे  सचिन बानबले  लीलाधर हेटकर रामदास मेश्राम अमोल कंकलवार गणेश मॅकलवारमंगेश ठाकरे नितेश गोवर्धन अश्विन रोहनकर  उत्तम आरेकर  बळीराम गोरडवार चंद्रशेखर रोहनकर  सपना गोवर्धन केतन सहारे  प्रतिमा कोहपरे लहू काबेवार  भीमराव कराडे
व्यंकट तुलावी  योगेश लोहंबरे पराग आत्राम सूरज प्रधान सूरज इदूलवार  संजय चापले अशोक कांबळे
निराशा मडावी नंदू गेडाम सुषमा गेडाम अविनाश ठाकरे पुष्पा गेडाम  उत्तम रोहनकर  धनंजय जांभूळकर
पूजा कोमावार  सीमा पेंदोर हेमंत वाघरे दिलीप वेलादी आशिक गोरडवार राजू कमंबलवार  उपस्थित होते

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.