जिल्हा
उद्या तैलीक महासभेची गडचिरोलीत बैठक * बैठकीला उपस्थित राहण्याचे प्रमोद पिपरे यांचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली :– महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जिल्हास्तरीय आढावा बैठक उद्या 4 ऑगस्ट रोजी गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली आहे.सदर बैठक आरमोरी मार्गावरील राणी दुर्गावती कन्या शाळेजवळील संताजी भवनात सकाळी 11 वाजता आयोजीत करण्यात आली आहे.
बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष माजी खा. रामदास तडस, कोशाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश महासचिव डॉ. भूशण कार्डीले उपस्थित राहणार आहेत. तरी बैठकीला प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी व तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे यांनी केले आहे.