जिल्हा

आपुलकीचा स्पर्श… सेवाभावाच  दर्शन; माजी .खा. डॉ. अशोक नेते यांची जिल्हा सामान्य रुग्णालय भेट !  * रुग्णांची आस्थेने विचारपूस,  डॉक्टरांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा देण्याच्या केल्या सुचना

AVB NEWS गडचिरोली :-  गडचिरोलीसारखा आदिवासी व आंकाक्षीत जिल्हात, आरोग्याच्या सोयी-सुविधा दर्जेदार मिळावेत व रुग्णांच्या आरोग्यविषयक तपासणी व उपचार डॉक्टरांनी योग्य तऱ्हेने करावे‌ यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक  नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक भेट देऊन, रुग्णांच्या अडचणी जाणून घेतल्या.

डॉ. अशोक नेते यांची ही भेट फक्त एक पाहणी नव्हती, तर सेवेच्या व्रताने झपाटलेल्या नेतृत्वाची जिवंत अनुभूती होती. त्यांनी दाखवलेली ही आपुलकी, रुग्ण आणि त्याच्या कुटुंबासाठी म्हणजे मानसिक औषधच ठरली.
“रुग्णसेवा म्हणजेच ईश्वरसेवा” — हे ब्रीद मनापासून पाळणाऱ्या डॉ.  अशोक  नेते यांच्या कार्यातून, गडचिरोलीच्या आरोग्यसेवेला नवे बळ मिळेल, अशीच  भावना व्यक्त करण्यात आली.

माजी .खा. डॉ. अशोक नेते थेट रुग्णांच्या खाटेपाशी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. औषध मिळते का? डॉक्टर तपासायला येतात का? जेवण वेळेवर मिळतंय का? औषधी बाहेरून बोलावलं जाते का? काही त्रास तर नाही ना? अशा आपुलकीने त्यांनी रुग्ण यांसोबत बोलून मन जिंकलं. हात धरून, डोळ्याला डोळा लावून, माणूस म्हणून माणसाला दिलेला आधार सगळ्यांना भावला.

“ही सेवा नाही, ही जबाबदारी आहे!”वार्डातील स्वच्छता, अन्नाची व्यवस्था, औषधांचा साठा, शौचालयांची स्थिती अशा सर्व गोष्टींची पाहणी करत, डॉक्टरांना त्यांनी सांगितलं “हे सरकारी काम नाही, हे लोकांचं आयुष्य आहे… सेवा म्हणजे सेवा नव्हे, ती आपली जबाबदारी आहेअसे माजी खा. नेते म्हणाले.

या दौऱ्यात जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, रुग्णांचे नातेवाईक आणि अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

रुग्णांच्या सेवेसाठी तत्परता

यावेळी चामोर्शी तालुक्यातील घारगाव येथील सेवकराम बोरकुटे नावाच्या रुग्णाची तब्येत खालावल्याचे लक्षात येताच, डॉ. नेते यांनी लगेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोलंकी यांना फोन करून सविस्तर माहिती घेतली.डॉ. सोलंकी यांनी तत्काळ डॉ. मनिषजी मेश्राम यांना रुग्णालयात पाठवले आणि त्वरित उपचार सुरू झाले. हा प्रसंग म्हणजे सेवाभाव आणि कार्यक्षमतामुळे ठरलं.

गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज – भविष्यासाठी आशेचा किरण

“आपण गडचिरोलीत मेडिकल कॉलेज आणलं. पहिली बॅच सुरु झाली. हे केवळ शिक्षणाचं ठिकाण नाही, तर आपल्या जिल्ह्याला आरोग्याच्या दृष्टीने मजबूत बनवायचं केंद्र आहे.”रुग्णालयातील एकंदरीत वैद्यकीय सेवांचा, व मेडिकल कॉलेजशी संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेचाही आढावा लवकरच घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“या रुग्णालयात गोरगरीब, गरजू, सर्वसामान्य माणसाला योग्य सेवा मिळावी, यासाठी मी स्वतः लक्ष ठेवणार आहे,” असा विश्वास मा.खा. डॉ. नेते रुग्णांच्या भेटीदरम्यान व्यक्त केला.

 

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.