जिल्हा

उद्या  कष्टकऱ्यांचा उत्सव साजरा होणार : शेकापच्या स्थापना दिनी भव्य मेळाव्याचे आयोजन  * मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

AVB NEWS गडचिरोली : राज्यातील कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर बहुजन श्रमिकांच्या हक्क – अधिकारासाठी लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त रविवार दिनांक ३ ऑगस्ट रोजी गडचिरोली तालुक्यातील मौजा – नवेगाव येथील प्रसन्न सेलिब्रेशन येथे दुपारी १२ वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात विधवा महिला, निराधार पेंशनधारक, शेतकरी, शेतमजूरांचे हक्क आणि अधिकार, बेरोजगार भूमिपूत्रांच्या समस्या, शेतमालाला दिडपट हमीभाव तसेच भटक्या विमुक्तांचे कमी केलेले आरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करण्यात येणार आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समिकरणांची मांडणी केली जाणार आहे.

या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस भाई राहुल देशमुख, विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष साम्याताई कोरडे, आदिवासी, भटके – विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, मध्यवर्ती समिती सदस्य भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याला शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि ओबीसी, भटके विमुक्त बहुजन व आदिवासी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संजय दुधबळे, जिल्हा समिती सदस्य डॉ. गुरुदास सेमस्कर, अक्षय कोसनकर, रमेश चौखुंडे, चंद्रकांत भोयर, चिरंजीव पेंदाम, अशोक किरंगे, पांडुरंग गव्हारे, दामोदर रोहणकर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, रस्ते – महामार्ग बाधीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गव्हारे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मीश वासनिक, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबणवाडे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शोएब सय्यद, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, विद्यार्थी आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अभिलाषा मंडोगडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुड्डू हुलके यांनी केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.