जिल्हा

मेडीकल कॉलेजच्या जागेसाठी कॉंग्रेसने केले ‘भिक मांगो आंदोलन’ **मुख्यमंत्री हेच गडचिरोलीचे पालकमंत्री असतांनाही कॉलेजसाठी अद्यापही जागा उपलब्ध झाली नाही

AVB NEWS गडचिरोली : गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अद्यापपर्यंत स्वतंत्र इमारत नाही. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेची खरेदी करण्यासाठी शासनाकडे निधी नसेल तर आम्ही पैसे गोळा करून शासनाला देतो, असे म्हणत काँग्रेसने शुक्रवारी इंदिरा गांधी चौकात ‘भीक मांगो’ आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल असे दोन-दोन पालकमंत्री लाभले असतानासुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा उपलब्ध होत नसेल तर ही सरकारची निष्क्रियता असल्याचा आरोप यावेळी ब्राह्मणवाडे यांनी केला.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली, पण अजूनपर्यंत ती भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, नगरसेवक सुमेध तुरे, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, जितेंद्र मुनघाटे, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढिवरू मेश्राम, प्रफुल आंबोरकर, सुभाष धाईत, अविनाश श्रीरामवार, विजय लाड, रमेश धकाते, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, रवींद्र पाल, मजीद सय्यद, कुणाल ताजने, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, सुदर्शन उंदीरवाडे, दिनेश चापले, प्रसाद कवाखें, देवेंद्र बांबोळे, मुखरू देशमुख, मुखरू गेडाम, स्वप्नील गेडाम, लालाजी बावणे, ईश्वर गेडाम, भास्कर गेडाम, विवेक घोंगडे, अभिजित धाईत, पुरुषोत्तम सिडाम, श्रीकांत कठोटे, चोखोबा ढवळे, संदीप भैसारे, नितीन लाडे, सुदर्शन उंदीरवाडे, रवी मेश्राम, हेमंत कोवासे, पुष्पलता कुमरे, पौर्णिमा भडके, कविता उराडे, रिता गोवर्धन, सुनीता रायपुरे, कविता उराडे आदी अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.