जिल्हा

गडचिरोली जिल्ह्यातून ओबीसी महा अधिवेशनाला 250 ओबीसी बांधव जाणार !  * गोवा येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन

AVB NEWS गडचिरोली :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे महाअधिवेशन गोवा येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी येथे 7 आगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाला संपूर्ण देशातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून सुद्धा या अधिवेशनासाठी 250 ओबीसी बांधव हजेरी लावणार आहे. त्यापैकी 50 ओबीसी बांधवांचा जथ्था आज 31 जुलै रोजी गडचिरोली वरून रवाना झाला आहे.

ओबीसींच्या विविध समस्यावर विचार मंथन या महाअधिवेशनात होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत करणार आहे. भारताचे माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंग यांनी 7 आगस्ट 1990 रोजी मंडल आयोग या देशात लागू केला त्यामुळे देशातील ओबीसी बांधवांना सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण मिळाले या सोन्याच्या दिवसाचे दरवर्षी स्मरण व्हावे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने या दिवशी विविध राज्यात महा अधिवेशन घेऊन ओबीसींच्या समस्यावर मंथन करण्यात येते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.