विशेष

उद्या गडचिरोलीत ‘रंग लोककलेचा’ कार्यक्रमाची मेजवानी * आ डॉ. मिलींद नरोटे व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली:-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वाढदिवसानिमित्य सेवा पंधरवाडा राबविण्यात येत असून यानिमित्य आ. डॉ. मिलींद नरोटे व मित्र परिवाराच्या वतीने उद्या 27 जुलै रोजी ‘रंग लोककलेचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात सायंकाळी 6 वाजता आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय गोंधळ, वासुदेव, भारूड, लावणी, कोळी गीत, जोगवा, शेतकरीनृत्य, आदिवासी नृत्य यासह धार्मिक व देशभक्तीपर गीत व नृत्याचे सादरीकरण केले जाणार आहे. सदर कार्यक्रमाचे मुंबई येथील 25 कलावंतांच्याद्वारे सादरीकरण होणार आहे.या कार्यक्रमाचा आंनद घेण्याचे आवाहन आ. डॉ. मिलींद नरोटे व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.