कारगील विजय दिनानिमित्त गडचिरोलीत शहीदांना मानवंदना

AVB NEWS गडचिरोली :-
कारगील युद्धात भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना मानवंदना देण्यासाठी आज कारगिल विजय दिन गडचिरोली शहरात साजरा करण्यात आला.कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कारगील विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड, कोणसरी,कारगील स्मारक समिती,शासकीय पुंरनियुक्ती माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा विजय दिन साजरा करण्यात आला.
कारगिल चौक येथे सकाळी ९.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला विविध स्तरांतील नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात “अमर जवान” स्मारकास पुष्पप्रपुष्पगुच्छ अर्पण करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. वातावरण भारावून गेले होते. संपूर्ण परिसरात “भारत माता की जय”, “वंदे मातरम” आणि “शहीद जवान अमर रहें!” अशा अशा घोषणांनी कारगील चौक परिसर दुमदुमून गेला.
लॉयड मेटल एनर्जी चे निवासी संचालक निवृत्त कर्नल विक्रम मेहता, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. या वेळीप्रमुख अतिथी माजी खासदार अशोक नेते, खासदार नामदेव किरसान,म्हणून कारगिल चौक चे अध्यक्ष उदय धकाते,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घिसूलाल काबरा, लॉयड चे हिम्मतसिंह बेडला, लॉयड चे संचालक नटराजन, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, माजी सैनिक जयवंत काटकर, कर्नल एस. के. महापात्रा, कर्नल महेंद्रसिंह, कर्नल रामनाथ स्वामी, मेजर जितेंद्र नागपाल, सुभेदार मेजर पंजननाथन, सुभेदार ऋषीजी वंजारी, कॅ. फगवा ओरन, सुभेदार रामप्रताप शर्मा, यशवंत सिंगारे, महादेव वासेकर, सुभाष नागमोती, मो. सलीम सय्यद, राजू भांडेकर, अरुण बुरांडे, दशरथ गव्हारे, मनोज जावळे, सोमनाथ वैरागडे, दौलत तलमले, सुरेंद्र पाल, दिपक मेश्राम, कैलास कुथे, संजय चौधरी, कैलास सिडाम, वामन ठाकरे, ईश्वर राऊत (नायब तहसीलदार), केशव वड्डे, निलकंठ कुथे, घनश्याम समरित, गुरुदेव सातपुते, धनराज गिरडकर, सुशिल भोयर, खेमचंद सहारे,माजी सैनिक वालदे,आदी माजी सैनिक व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष कालू गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनिल देशमुख, मोतीराम हजारे, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे,राजू डोंगरे,राजेंद्र साळवे,सुचिता धकाते, निलिमा देशमुख,वनिता भांडेकर, विद्या कुमरे, वनिता धकाते, अंजली भांडेकर, आदींनी विशेष परिश्रम घेतले.