वडीलांमुळेच आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळातून सावरण्याची ताकद मिळाली ! अरविंद सा. पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन * दिवंगत माझी आमदार नामदेराव सा.पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य कार्यक्रम * व्याघ्र बळींच्या कुटुंबियांना जीडीसीसी बॅंकेच्या वतीने आर्थिक मदत

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- वडीलांनी प्रतिकुल परिस्थीतीत समाजकारण व राजकारण करून लोकहिताला प्राधान्य दिले. वडीलांमुळेच आयुष्यात आलेल्या प्रत्येक वादळातून सावरण्याची ताकद मिळाली. त्यांचा विचाराचा वारसा अविरत जपला जाईल, असे प्रतिपादन जेष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार यांनी केले.
जिल्हयात मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे. वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेल्या कुंटुंबाला आधार मिळावा या हेतूने मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने मदतीचा हात’ दिला जात आहे. काल 25 जुलै रोजी बॅंकेच्या प्रांगणात अतिशय भावूक वातावरणात दोन वाघ्रळीच्या कुटुंबियांना प्रत्येकी 75 हजाराची आर्थिक मदत देण्यात आली.
दिवंगत माजी आमदार नामदेवराव सा. पोड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाप्रसंगी ‘परंपरा लोकहिताची’ या स्मरणीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, गडचिरोली नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, माजी आ. डॉ. देवराव होळी, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. कृश्णा गजबे, बॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार, सचिव अनंत साळवे, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, माजी नगराध्यक्ष सुरेश सा. पोरेड्डीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाग्यवान खोब्रागडे, लॉयड मेटल्सचे कर्नल विक्रम मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा निर्मितीच्या पुर्वी नामदेवराव पोरेड्डीवार यांनी गडचिरोलीतून पहिले आमदार होण्याचा सन्मान प्राप्त केला ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या विचारांचा पुढच्या पिढीने कायम ठेवला. त्यामुळेच दु:खी पिडीतांना मदत करण्याचे काम अरविंद पोरेड्ीवार व त्याच्या पिढीकडून सुरू असून गरजवंतांना आधार देणे मोठे पुण्याचे काम आहे, असे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने सन 2024.-25 चा जिल्हा गौरव पुरस्कार गोगाव येथील दादाजी चुधरी यांना सहकार, कृषी शिक्षण व कला क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.50 हजार रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
याप्रसंगी गडचिरोली नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश सा.पोरेडडीवार यांचा वाढदिवसानिमित्य विशेश सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅंकेचे अध्यक्ष प्रंचीत पोरेड्डीवार यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर, तर आभार बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.