मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले ‘आर्यन वुमन’ चे कौतुक *एलएमईएलने केली ‘आयर्न वुमन’ कार्यक्रमाची सुरुवात, वोल्वो एलएनजी ट्रक वरील लोहखनिज पेलेट च्या पहिल्या खेपेला मुख्यमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या खनिज वाहतुकीतील उत्सर्जन कमी व्हावे ह्या दृष्टिकोनाचा भाग म्हणून नऊ व्होल्वो एफएम ४२० एलएनजी ट्रक वरील लोहखनिज पेलेट च्या पहिल्या खेपेला हिरवी झेंडी दाखवली आणि एलएमईएलने व्होल्वो ट्रक्स इंडियासोबत हाती घेतलेल्या ‘आयर्न वुमन’ उपक्रमाचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलएमईएल-व्होल्वो उपक्रमाचे आणि गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचा चेहरा बनल्याबद्दल ‘आयर्न वुमन’ यांचे कौतुक केले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘आयर्न वुमन’ चालवणार असलेल्या नऊ एलएनजीवर चालणाऱ्या व्होल्वो एफएम ४२० ट्रकला हिरवी झेंडी दाखवली.
ह्याप्रसंगीजिल्ह्याचे सह-पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन, व्होल्वो ट्रक्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष श्री. बोद्दपती दिनकर, आमदार श्री. धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. परिणय फुके आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
“गडचिरोलीतील माझ्या बहिणी जिल्ह्यात सकारात्मक सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे चेहरे म्हणून उदयास येत आहेत हे मला कौतुकास्पद वाटते. जेव्हा एका ‘आयर्न वुमन’ सहभागीने मला सांगितले की ती सुरुवातीला एलएमईएलमध्ये हाऊसकीपिंग चे काम करीत होती, पण त्यानंतर कंपनीने तिला हलके मोटार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले आणि आता ती एलएनजी ट्रक चालवत आहे तेव्हा मला अभिमान वाटला. कारण यामुळे तिचा आत्मविश्वासच वाढला नाही तर तिला मिळणाऱ्या पगारात १२,००० रुपयांवरून आता ५५,००० रुपयांपर्यंत वाढ मिळण्यास सक्षम केले आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
श्री. प्रभाकरन म्हणाले, “लॉयड्स मेटल्स चा विश्वास आहे की व्यावसायिक प्रगती ही सामाजिक-आर्थिक विकास, महिला सक्षमीकरण आणि समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबल यांच्यासोबतच पुढे जावी.” व्होल्वो एलएनजी ट्रक्ससह ‘आयर्न वुमन’ कार्यक्रम हा सक्षमीकरण आणि प्रगती दोन्हीला चालना देणाऱ्या सुलभ, तंत्रज्ञान-सक्षम संधी निर्माण करण्यासाठीचा महत्वाचा उपक्रम आहे, असे ते म्हणाले.
“खनिज क्षेत्रातील दळणवळणात अर्थपूर्ण बदल घडवून आणून नवीन मानके स्थापित केल्याबद्दल आम्ही लॉयड्स मेटल्सचे कौतुक करतो,” असे श्री. बोद्दपती दिनकर म्हणाले. ते पुढे म्हणाले, “समावेशक कार्यबल विकासासह स्वच्छ गतिशीलतेचा मेळ घडवून आणण्याचा त्यांचा उपक्रम अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक आहे. भारत अधिक शाश्वत भविष्याकडे वाटचाल करत असताना, आमच्या तंत्रज्ञान आणि कौशल्याने अशा उपक्रमांना सक्षम करण्याचा व्होल्वोला अभिमान आहे.”
‘आयर्न वुमन’ उपक्रम हा खनिज क्षेत्रात स्थानिक महिलांना अवजड वाहने चालविण्यासाठी सक्षम करण्यासाठी एक अग्रगण्य चालक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. सदर उपक्रम भारताच्या औद्योगिक क्षेत्रातील समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबल विकासातील एक नवीन अध्याय आहे. व्होल्वोने सुरू केलेल्या जागतिक संकल्पनेतून ‘आयर्न वुमन’ हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे. एलएमईएलने भारतातील खनिज क्षेत्रात पहिल्यांदाच हा कार्यक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील महिलांना औद्योगिक लॉजिस्टिक्समध्ये कुशल भूमिका बजावता येतील.
शाश्वत लॉजिस्टिक्सच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, एलएमईएलने नऊ एलएनजी-चालित व्होल्वो एफएम ४२० ट्रक आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहेत. व्होल्वो ट्रक्स इंडियाने उपलब्ध करून दिलेले हे ट्रक प्रगत सुरक्षा आणि इतर वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहेत, ज्यामुळे ते पहिल्यांदाच ह्या ट्रक्स चे संचालन करणाऱ्यांसाठी आदर्श ठरतात आणि खाण लॉजिस्टिक्समध्ये स्वच्छ गतिशीलतेला चालना देतात.